नितेश राणेंविरुद्धच्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपल्याविरुद्धचे हे प्रकरण अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्याची मागणी नितेश यांनी यापूर्वी केली होती.
नितेश याच्याविरुद्ध दाखल मानहानी प्रकरणाची माझगाव येथील न्यायदंडाधिकारी एम. आर. ए. शेख यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. मात्र, या प्रकरणाची सुनावणी अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करावी, अशी मागणी नितेश यांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर केली होती. दरम्यान, न्यायदंडाधिकारी शेख यांची बदली झाल्याने नितेश यांच्याविरुद्धच्या प्रकरणाची सुनावणी लांबण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी, नितेश यांनी राऊत यांना साप म्हणून संबोधले होते. तसेच, राऊत हे उद्धव ठाकरे यांना सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील, असा दावा केला होता. त्यानंतर, राऊत यांनी राणे यांच्याविरोधात मानहानीचीफौजदारी तक्रार दाखल केली होती व बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी माझगाव न्यायालयाने नितेश यांना जामीनपात्र वॉरंट बजावून त्याना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. नितेश यांनी न्यायालयात उपस्थित राहून वॉरंट रद्द केले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.