Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महादेव मुंडे खून प्रकरणात माहिती देणाऱ्यास एसआयटी देणार रोख बक्षीस

महादेव मुंडे खून प्रकरणात माहिती देणाऱ्यास एसआयटी देणार रोख बक्षीस

बीड : खरा पंचनामा

बीड जिल्ह्याच्या परळी येथील मयत व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणाच्या जलद तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून एस.आय.टी. मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

मयत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकाला आता पोलिस प्रशासन रोख बक्षीस देण्यात येणार असून, त्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे एस.आय.टी चे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांनी नागरिकांना आव्हान केले असल्याची नुकतीच ही माहिती दिली.

मयत महादेव मुंडे खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एस.आय.टी. कडून आता वेगाने तपास सुरू झाले आहे मात्र, काही ठोस पुरावे व माहिती अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना एस.आय.टी. ने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, "या प्रकरणातील कुणालाही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तात्काळ द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल."

मयत महादेव मुंडे यांच्या हत्येला आता 21 महिने उलटून गेली आहेत आणि अश्या परिस्थितीत आय पी एस पंकज कुमावत यांना मोठ आव्हान असून या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटी चे प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाने कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे. मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड जावा, अशी अपेक्षा नातेवाइकांसह सर्वत्र व्यक्त होत आहे. एस.आय.टी.टीम किती लवकरात लवक या प्रकरणाचा शोध घेणार हे पाहण महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, महादेव मुंडे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला गळा कापून हत्या करण्यात आली होती. मुंडेंवर खोलवर वार केले गेले होते, श्वसननिलका आणि रक्तवाहिनी फुटली होती. मानेवर उजव्या बाजूला आणि तोंडासह गालापर्यंत खोलवर वार होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.