अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे पाच जणांच्या टोळीकडून लाखोंचा गंडा
नाशिक : खरा पंचनामा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नावाने बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर बनाव ट जाहिरात पोस्ट करून आणि आमिष दाखवून मराठा प्रवर्गात नसलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळलीये.
तसेच बनावट कर्ज प्रकरण मंजूर करत अनुदान लाटल्याचेसमोर आलेआहे. याप्रकरणी पाच जणांच्या टोळीने सुमारे 5 लाख 63 हजार 160 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झालेआहे. या प्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत सातपूरच्या कार्यालयात संशयितांनी संगनमताने महामंडळाच्या संमती शिवाय अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे छायाचित्र वापरून 'अण्णासाहेब पाटील' नावाचा बनावट व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवर संशयितांनी महामंडळाच्या नावाने खोटी जाहिरात बनवून पोस्ट केली. या योजनेंतर्गत लाभार्थीना लाभमिळवून देण्याचे आमिष या तिघांनी दाखवून रक्कम उकळली. अशाप्रकारे 1 लाख 80 हजार 592 रुपये लाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विश्वजीत गांगुर्डे, मनोज जगताप आणि विश्वास जगताप यांच्याविरुद्ध महामंडळाच्या कार्यालयातील नोकरदार पल्लवी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.