Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप

बंगळूरू : खरा पंचनामा

महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना कर्नाटकच्या खासदार आमदार न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज (दि.2) रेवण्णांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसमध्ये माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवन्ना यांचे कथित अश्लील फोटो असलेला पेन ड्राइव्ह व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. या प्रकरणात पोलिसांनी माजी खासदार रेवन्ना यांना 31 मे 2024 रोजी अटक केली होती. रेवन्ना यांच्यावर हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील एका फार्महाऊसमध्ये 48 वर्षीय मोलकरणीवर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप होता.

रेवन्ना यांच्या पेन ड्राइव्हमध्ये सुमारे 2 हजार अश्लील व्हिडिओ असल्याचा आरोप आहे. रेवन्ना यांच्यावर प्रथम महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. रेवन्ना यांच्याविरुद्ध पहिली तक्रार एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. महिलेने आरोप केला होता की रेवन्ना 2021 पासून तिच्यावर बलात्कार करत होता.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेने घातलेली साडी ही ठरली आहे. तपासात त्या साडीवर शुक्राणूंचे (स्पर्मचे) डाग आढळून आले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीमध्ये रेवण्णाचे असल्याचं समोर आलं आहे. मोलकरणीची ती साडी मोठा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली होती. हा सर्वात मोठा पुरावा मानला गेला. त्याचबरोबर बलात्काराचे व्हिडिओ देखील कोर्टात सादर करण्यात आले होते. पीडितेने केवळ साडी जपून ठेवली नाही. तर तिने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्डही केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.