'अयोध्येतील राम मंदिर उडवायचंय.., एक लाख देतो...'
बीडच्या तरुणाला थेट पाकिस्तानमधून मेसेज
बीड : खरा पंचनामा
अयोध्येचे राममंदिर उडवण्याबाबत थेट बीडच्या तरुणाला फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटले आहे. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले.
संबंधित तरुण सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेजद्वारे सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.