'ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणे महत्वाचे'
दिल्ली : खरा पंचनामा
सात वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पोहोचले आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले. या भेटीमुळे भारत-चीन संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोदींचे स्वागत करताना स्पष्ट शब्दांत सांगितले "ड्रॅगन आणि हत्ती एकत्र आले तर आशिया आणि जगात शांतता व समृद्धीची नवी दिशा मिळेल."
या वर्षी भारत-चीन राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शी जिनपिंग यांनी या ऐतिहासिक क्षणी दोन्ही देशांनी आपले संबंध दीर्घकालीन व धोरणात्मक दृष्टिकोनातून हाताळण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले "बहुपक्षीयता, बहुध्रुवीय जग आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक लोकशाही टिकवण्याची जबाबदारी भारत आणि चीनची आहे. या भूमिकेतूनच आशिया तसेच संपूर्ण जगासाठी स्थिरता निर्माण करता येईल."
चर्चेदरम्यान शी जिनपिंग यांनी भारताला 'हत्ती' तर चीनला 'ड्रॅगन' या प्रतिमांमध्ये पाहिले. ते म्हणाले "आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत. अशा परिस्थितीत, एक चांगला शेजारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रॅगन आणि हत्ती एकत्र आले, तर ते संपूर्ण जगासाठी आशेचा किरण ठरेल." हा उल्लेख केवळ राजनैतिक भाषण नव्हता, तर दोन प्राचीन संस्कृतींमधील सहकार्य व परस्पर आदराचा नवा संदेश होता.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी चीनकडे तीन शब्दांत स्पष्ट संदेश दिला विश्वास, आदर आणि संवेदनशीलता. मोदींचा हा मोलाचा उच्चार म्हणजे, भारताचे परराष्ट्र धोरण केवळ औपचारिकतेवर नाही तर परस्पर विश्वासावर आधारलेले आहे, याचा ठोस इशारा होता. त्यांनी चीनला हे अधोरेखित केले की, या तीन गोष्टींवरच खरी भागीदारी उभी राहू शकते. अन्यथा दोन्ही देशांतील मतभेद अधिक गहिरे होण्याची शक्यता राहते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.