महादेवी ऊर्फ माधुरीबाबत वनताराने प्रसिद्ध केलं पत्र
जामनगर : खरा पंचनामा
नांदणी येथील महादेवी ऊर्फ माधुरी हिला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पाला हस्तांतरीत करण्यात आली. यासंबंधी विविध माध्यमांतून व सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या भावना व प्रतिक्रिया लक्षात घेता वनताराकडून अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वनताराने खुलासा केला आहे की, कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठामधून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणीसोबत प्रेम आणि भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगते. नांदणी मठात तिची उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती.
आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे नुसार करण्यात आली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. महादेवीला वनतारामध्ये स्थलांतरीत करण्यासाठी आरंभकर्ता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही जबाबदारी घेऊन देखभाल करत आहोत.
माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू आहे. वनताराच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली.
जनतेच्या तीव्र पडसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबद मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गे माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल.
वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.