मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढलं
बीड : खरा पंचनामा
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. बीडमधलं एक मोठं शिवाजीराव क्रिटिकल केअर नावाचां हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात ही घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जात होते. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्टने पहिल्या मजल्यावर जाताच लिफ्ट अचानक बंद झाली, आणि ती पहिल्या मजल्यावरून थेट ग्राऊंड फ्लोअरला येऊन आदळली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या लिफ्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी देखील होते, त्या सर्वांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं.
मनोज जरांगे पाटील हे रुग्णाला भेटायला जात असताना पहिल्या मजल्यावर ही लिफ्ट अचानक बंद पडली, त्यानंतर ती पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.