सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर रोखली बंदूक, पोलिसांकडून गोळीबार
नांदेड : खरा पंचनामा
नांदेड शहरातील पोलीस आणि आरोपीमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेव्हा गुन्हेगाराने चक्क पोलिसांवर रिवाल्वर रोखली. पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात आरोपी पसार झाला आहे. नांदेड शहरातील कौठा भागात हा थरार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुरज सिंह गाडीवाले हा नांदेड शहरातील कौठा परिसरात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कौठा परिसरात पोहोचले. तेव्हा सराईत गुन्हेगार सुरज सिंघ गाडीवाले कारमधून आला. मात्र पोलीस आल्याची त्याला कुणकुण लागली आणि त्याने गाडी पळवली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने पाठलाग केला तेव्हा आरोपी सूरज सिंघ गाडीवाले याने आपल्या जवळील गावठी पिस्टल काढली. त्याला उत्तर म्हणुन पोलिसांनी फायरिंग केली.
दरम्यान, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला आहे. त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपी सुरज गाडीवाले हा रेकॉर्डवरचां गुन्हेगार आहे. त्याचे कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा सोबत संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्याला अटक करणं हे पोलिसांपुढेच आव्हान असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.