Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकणार"

"आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकणार"

बीड : खरा पंचनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज आणि उद्या या दोन दिवसांची संधी देतो. या दोन दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठ्यांना मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्याचे पाहायला मिळतंय.

येत्या २६ तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारा केली. इतकंच नाहीतर आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत सरकारला थेट धमकी दिली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मराठा आरक्षणासाठी धडकणार असून त्यांनी राज्यातील सगळ्या मराठा बांधवांना या मोर्चात सहभागी होण्यास सांगितलंय. जरांगे म्हणाले, राज्यातील नोकरदार आणि कर्मचारी वर्गाने आता काम धंदे सोडा. सध्या सगळं बंद ठेवून मुंबईच्या दिशेने जाण्याची तयारी सुरू करा. असा उठाव पुन्हा होणार नाही, एकजुटीचा, एकतेचा असा विजयाचा सोहळा पुन्हा होणार नाही त्यामुळे प्रत्येक मराठ्यांच्या घरच्यांनी या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या मोर्चासाठी मराठ्यांना केलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.