धनंजय मुंडेंनी बंगला सोडवेना, दंड ४२ लाखांवर; मंत्री भुजबळ वेटिंगवर
मुंबई : खरा पंचनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरीपुरवठा खातं होतं. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ५ महिन्यांचा काळ उलटला तरी धनंजय मुंडे यांनी त्यांचा सरकारी बंगला अद्याप रिकामा केलेला नाही. धनंजय मुंडेंना सातपुडा हा सरकारी बंदला देण्यात आला होता. आता मंत्रिपद सोडल्यानंतरही बंगला रिकामा न केल्यानं त्यांच्यावर लागू केलेल्या दंडाची रक्कम तब्बल ४२ लाखांवर पोहोचली आहे. हा दंड माफ करण्याचा विशेषाधिकार मुख्यमंत्र्यांना असतो.
सातपुडा हा बंगला मुंबईतील मलबार हिल परिसरात आहे. धनंजय मुंडे यांना हा बंगला देण्यात आला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्र्यांसाठीचे सरकारी निवासस्थान हे १५ दिवस वापरण्याची परवानगी असते. मात्र गेल्या पाच महिन्यापासून धनंजय मुंडे यांनी या बंगल्याचा ताबा सोडला नसल्यानं मंत्री छगन भुजबळ हे बंगल्यासाठी वेटिंगवर आहेत. मंत्रिपद सोडल्यानतंरही त्याच बंगल्यात रहायचं असेल तर त्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक असते. अन्यथा नियमानुसार दंड आकारण्यात येतो.
धनंजय मुंडे यांना दिलेल्या सातपुडा बंगल्याचं क्षेत्रफळ ४ हजार ६६७ चौरस फूट इतकं आहे. त्यासाठी दरमहा २०० रुपये प्रति चौरसफूट इतका दंड आकारला जातो. या दंडाची रक्कम महिन्याला ९..३३ लाख रुपये इतकी आहे. साडेचार महिन्यांपेक्षा जास्त काळ बंगला धनंजय मुंडे यांच्याकडेच असल्यानं दंडाची रक्कम तब्बल ४२ लाखांच्या पुढे गेली आहे.
निवासस्थान सोडण्याच्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीचं कारण दिलंय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत राहणं आवश्यक आहे आणि मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. यामुळे मी मुदतवाढ मागितली आहे. याआधीही अनेक माजी मंत्र्यांनी अशी मुदतवाढ दिली गेली होती. मुंडे यांच्यामुळे छगन भुजबळ यांना निवासस्थानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहेत. मंत्री असूनही त्यांना अद्याप निवासस्थान मिळालेलं नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.