'महादेवी'ला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार!
उच्चस्तरीय बैठकीत फडणवीसांची ग्वाही
मुंबई : खरा पंचनामा
महादेवी हत्तीणी संदर्भात आज M मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत महत्वाची बैठक झाली. बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, उपस्थित राहणार होते.
बैठकीत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात यासाठी महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार असल्याचा बैठकीत घेण्यात आला.
महादेवी परत यावी, अशी आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांच पथक तयार करण्यात येईल, राज्य सरकार नांदणी मठासोबत पूर्ण ताकदीनिशी सोबत राहिल, असे मुख्यमंत्री म्हणाले
लोकप्रतिनिधींची आणि वनविभागाच्या अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वन्यजीवचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार, लोकप्रतिनिधींसह नांदणी मठाचे विश्वस्त सागर शंभूशेटे, भालचंद्र पाटील, सागर पाटील, अॅड. मनोज पाटील यांच्यासह वनविभागातील अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील नादंणी गावाच्या मठातील माधुरी हत्तीण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. माधुरी हत्तीण चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे हत्तीणीला वनतारा मध्ये नेण्यात आले आहे. माधुरीला नेल्यामुळे नांदणी गावातील नागरिक नाराज झाले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मोर्चे काढत माधुरीला नेऊ नका अशी मागणी नांदणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र तरीदेखील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आली आहे.
धार्मिक पंरपरा मोडून काढण्याचा प्रयत्न पेटा संस्थेने केला आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. 'वनतारा' येथून महादेवी आम्ही परत आणणारच, असा विश्वास राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. कायदेशीर बाबी तपासून पुढील लढा देण्यात येईल, असे खासदार धैयशील माने यांनी सांगितले.
महादेवी हत्तीणीच्या कोल्हापुरात परतण्याचा निर्णय आता थेट सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यासाठी सरकार पक्षकार होणार आहे. त्यानंतर न्यायालयाकडून तिच्या पुनर्वसनावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
सरकारने आता स्पष्टपणे या प्रकरणात उडी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करून पक्षकार होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सरकारची भूमिका आहे की, महादेवीला तिच्या मूळ ठिकाणी म्हणजेच कोल्हापुरात पुन्हा आणण्याची शक्यता कायद्यानुसार तपासली जाणार आहे.
पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने बनाव करीत सर्वच हत्ती वनताराकडे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे कागदोपत्रानिशी आम्ही बैठकीत सिद्ध केले आहे. जर माधुरी हत्तीण ही शारिरीकदृष्ट्या फिट असल्याचे आठ रिपोर्ट आहेत. 48 तासांच्या प्रवासानंतर ती अनफिट कशी झाली? याचं उत्तर महाराष्ट्र शासनाने वनताराकडून घ्यावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.