Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

छत्रपती संभाजीनगर मध्ये "संकल्प व्यसनमुक्तीचा" पुस्तकाचे प्रकाशननशामुक्तीबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक यांची पोलीस आयुक्तालयात बैठक

छत्रपती संभाजीनगर मध्ये "संकल्प व्यसनमुक्तीचा" पुस्तकाचे प्रकाशन
नशामुक्तीबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक यांची पोलीस आयुक्तालयात बैठक

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

शहरात नशेखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालय यांच्या आदेशाने दि. 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्या अनुषंगाने सोमवारी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी शहरातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करुन त्यांना अंमलीपदार्थ संदर्भात दुष्परिणामांबाबत माहीती दिली. यावेळी अंमलीपदार्थ संदर्भात "संकल्प व्यसनमुक्तीचा" या पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
आयुक्तालयात आयोजित बैठकीत शाळेच्या परिसरात कोणी अंमलीपदार्थाचे सेवन अथवा विक्री करत असल्यास त्याबाबत माहीती पोलीसांना देण्याबाबत सांगण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त पवार यांनी मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या अडीअडचणी जाणुन घेवुन त्याबाबत त्यांचे निराकरण केले. शहरात विविध पोलीस ठाणी, दामिनी पथक व NDPS पथकामार्फत वेगवेगळया शाळा, महाविदयालयामध्ये विदयार्थ्यांना अंमलीपदार्थाचे दुष्परीणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वेगवेगळया एनजीओमार्फत पटनाथ्य सादर करण्यात आले. तसेच जिन्सी भागात अंमलीपदार्थाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने त्या ठिकाणी रॅली काढुन बॅनर व पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली. असे एकुण 52 अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले.
यावेळी अंमलीपदार्थ संदर्भात पोलीस आयुक्त पवार यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आलेले "संकल्प व्यसनमुक्तीचा" या पुस्तीकेचे  मुख्याध्यापक, प्राचार्य यांना वाटप करुन त्यांना पुस्तकाचे महत्त्व सांगुन त्यांच्या शाळा, महाविद्यालयामधील विदयार्थ्यांना त्याची माहीती देण्याबाबत सांगण्यात आले.

या बैठकीसाठी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मनोज पगारे, पोलीस निरीक्षक गिता बागवडे व शहरातील विविध शाळा, महाविदयालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थीत होते.

शहरामध्ये कोठेही अंमली पदार्थ विक्री करतांना किंवा नशा करतांना कोणी इसम किंवा नशाखोरी करणाऱ्या टोळया आढळून आल्यास तसेच नशेकरीता कोणी जागा उपलब्ध करुन देत असल्यास त्याबाबतची माहीती 9684702002 या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअप द्वारे मॅसेज करुन द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.