चाकू, तलवार घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक
सांगली, जतमध्ये एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहर तसेच जत येथे चाकू, तलवार अशी धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
हत्यारे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते. पथक शहरात गस्त घालत असताना नवीन वसाहत परिसरात चाकू घेऊन फिरणाऱ्या प्रशांत राजु चौगुले (वय २१, रा. भोला मेडीकलजवळ, वडर गल्ली) याला अटक केली. तसेच आपटा पोलीस चौकीजवळ वडर कॉलनी परिसरात चाकू घेऊन फिरणाऱ्या गणेश हणमंत पवार (वय २०, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वडर गल्ली) याला अटक केली. दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, अतुल माने, सुशिल म्हस्के, श्रीधर बागडी, विनायक सुतार, ऋतूराज होळकर, सुमित सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जत परिसरात शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. पथक जतमध्ये गस्त घालत असताना नागज रोडवरील एमआयडीसी रस्त्यावर पोत्यातून तलवार घेऊन फिरताना दिलीप शिवाजी जाधव (वय २४, धंदा चालक, रा. रामपुर, ता. जत) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अमर नरळे, संदीप नलावडे, सतिश माने, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, उदयसिंह माळी, विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.