Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापनधडाकेबाज आयपीएस अधिकारी करणार बीडमध्ये एन्ट्री

महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन
धडाकेबाज आयपीएस अधिकारी करणार बीडमध्ये एन्ट्री

बीड : खरा पंचनामा 

बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे कुटुंबाची मागणी मान्य केली आहे. फडणवीसांच्या आदेशानंतर आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरूवारी (ता.31) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार सुरेश धसही त्यांच्याबरोबर उपस्थित होते. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड व त्याचा मुलगाही सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय या हत्ये प्रकरणी अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही. नुकतंच आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.

त्यानंतर काल ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच स्थानिक पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता. अशातच ज्ञानेश्वरी मुंडेंनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना फोन गेल्यानंतर हा तपास थांबवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तर महादेव मुंडे हत्या प्रकरणात शंभर टक्के काही पोलिस अधिकारी सहभागी असून त्यांची नावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. शिवाय या पोलिसांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी आम्ही केल्याचंही धस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची पदोन्नती झाली होती, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची बदली करण्यात आली. ते असते तर असे प्रकार घडले नसते," असंही धस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.