Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक आंदोलन; 10 जणांवर गुन्हा दाखल

अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक आंदोलन; 10 जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : खरा पंचनामा

करमाळा पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात कारवाईसाठी गेलेल्या वेळी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फोनवर धमकी मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यासाठी पाठिंबा उमटत होता.

अशा परिस्थितीत जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या महिला अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ करमाळ्यातील कमलाभवानी मंदिरासमोर त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.

मात्र, आता या आंदोलनामुळे अतुल खूपसे यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 736 / 2025 असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

काल (शनिवार) करमाळ्यातील आई कमलाभवानी मंदिरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी DYSP अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण गांधीगिरी करत त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक केला होता. यावेळी "लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही", अशा आशयाचे फलकही झळकवण्यात आले होते. मात्र आता अतुल खूपसे यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.