कवठेमहांकाळमध्ये स्पेशल 26!
तोतया IT अधिकाऱ्यांची खोटी रेड अन् कोट्यवधींची लूट
तीन पुरुषांसह महिलेचाही समावेश
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
अक्षय कुमारच्या स्पेशल 26 चित्रपटाच्या कथेप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्येही एक खोटा छापा टाकून कोट्यवधी रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान तीन पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
कवठेमहांकाळमध्ये एका डॉक्टरच्या रुग्णालयात तसेच घरावर आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत छापा टाकून कोट्यवधीचे सोने आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आयकर विभागाकडून आल्याचे सांगत प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात बोगस आयकर पथकाने रविवारी रात्री अकराच्या सुमारास प्रवेश केला.
डॉक्टर म्हेत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत चौघांनी सिने स्टाईल पद्धतीने घराची झडती घेतली, ज्यामध्ये घरात असणारी 16 लाखांची रोकड तब्बल एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने जप्त केल्याचे सांगत तेथून पोबारा केला. त्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवठेमहांकाळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेतली.
दरम्यान, प्राथमिक तपासात हा छापा बोगस असल्याचे समोर आले असून सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र तोतया आयकर विभागाच्या छापा आणि लुटीमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.