Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्पेशल 26 चा जयसिंगपूर येथील मास्टर माईंड कवठेमहांकाळ पोलिसांना शरण आतापर्यंत पाच जणांना अटक

स्पेशल 26 चा जयसिंगपूर येथील मास्टर माईंड कवठेमहांकाळ पोलिसांना शरण 
आतापर्यंत पाच जणांना अटक
O
सांगली : खरा पंचनामा 

कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी तोतया आयकर अधिकारी बनून छापा टाकून 16 लाखांची रोकड आणि 1,410 ग्रॅम सोने लंपास करणाऱ्या स्पेशल 26 टोळीचा जयसिंगपूर येथील मास्टर माईंड रविवारी कवठेमहांकाळ पोलिसांना शरण आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी दिली. 

महेशकुमार रघुनाथ शिंदे (वय ४७, सध्या रा. रुम नं ८ जी ३, बर्वे नगर, म्युन्सीपल कॉलनी, घाटकोपर वेस्ट, मुंबई मुळ रा. कचरे सोसायटी जयसिंगपूर) असे शरण आलेल्या मास्टर माईंडचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी दिक्षा भोसले,  पार्थ मोहिते, दीपक मोहिते, अक्षय लोहार, शकील गौस पटेल यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक संशयित पसार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवार दि. १४ रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास कवठेमहांकाळ येथे डॉ. म्हेत्रे यांच्या घरी अनोळखी ३ पुरुष व १ महिला यांनी इनकम टॅक्स ऑफीस, मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करुन त्यांच्याकडील १,४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे व १५.६० लाखांची रोकड फसवणूक करुन घेऊन गेल्याने त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  गुन्हा गंभीर असल्याने कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना देवून गुन्हयाबाबत सविस्तर माहिती घेऊन वेगवेगळी पथके तयार करुन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दिक्षा भोसले,  पार्थ मोहिते, दीपक मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी अक्षय लोहार, शकील पटेल हे पोलिसांच्या भीतीने स्वतःहून पोलिसांत हजर झाले. तर रविवारी महेश शिंदे पोलिसांत हजर झाला. संशयितांकडून १,४१० ग्रॅम वजनाचे दागिने, बिस्किटे तसेच १५.०५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.