Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षण आंदोलनाप्रकरणी उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी

मराठा आरक्षण आंदोलनाप्रकरणी उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी

मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी दुपारी तातडीची सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे दुपारी दीड वाजता ही तातडीची सुनावणी होणार आहे. मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांची मोठया प्रमाणात गैरसोय होत असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिककर्त्यांनी केली होती ती न्यायालयाने मान्य केली.

तत्पूर्वी, जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा आणण्याचे जाहीर केले आहे. मात्र, जरांगे यांना परवानगीशिवाय हे आंदोलन करता येणार नाही. तसेच, त्यांना परवानगी देण्यात आली तरी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात दिले होते. त्यानंतरही जरांगे यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गणेशोत्सव काळात हे आंदोलन करण्यात येणार असल्याने या विरोधात जनहित याचिका करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेताना हे आदेश दिले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.