Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुरुंदवाड पोलीसांचा "राम कृष्ण हरी" च्या गजरात गणरायाला निरोप

कुरुंदवाड पोलीसांचा "राम कृष्ण हरी" च्या गजरात गणरायाला निरोप

जयसिंगपूर : खरा पंचनामा

टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "राम कृष्ण हरी"च्या गजरात कुरुंदवाड पोलिसांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. वारकरी वेशभूषा, भक्तिभाव आणि शिस्तबद्धतेतून काढलेली ही मिरवणूक शिरोळ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्या संकल्पनेतून ही आगळी-वेगळी मिरवणूक उत्साहात पार पडली.


कुरुंदवाड शहरातील माळभाग येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीपासून सुरू झालेली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने जात कृष्णा घाटावर पोहोचली. यावेळी दोनशेहून अधिक वारकरी सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी नेहरू शर्ट, धोतर आणि वारकरी फेटा परिधान करून पारंपरिक वेशभूषेत गणरायाला निरोप दिला. 

गळ्यात टाळ, हातात मृदंग आणि मुखात अभंग घेऊन निघालेली ही मिरवणूक संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करणारी ठरली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दांडपट्टा व शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके दाखवणारे शिव पथक विशेष आकर्षण ठरले. तसेच तुळशी विना तुंतुना, ढोल, डफली, ढोलकी अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर पोलिसांनी, नागरिकांनी जयघोष करत या मिरवणुकीची शोभा आणखी वाढवली.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक रविराज फडणीस, सागर पवार, सागर खाडे, नितीन साबळे, संतोष साबळे, अनिल चव्हाण, विवेक कराडे, ज्ञानदेव सानप, राजेंद्र पवार, एस. डी. यादव  यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उत्साहाने कुटुंबीयांसह या मिरवणुकीत सहभागी झाले. 

शिस्त, श्रद्धा आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडवत पोलीस प्रशासनाने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला.गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्र येत “भक्ती आणि सेवा” यांचा संदेश दिल्याचे भावनिक चित्र संपूर्ण मिरवणुकीत पाहायला मिळाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.