'नातवाची हत्या करतील याची आमच्याकडे माहिती नव्हती'
पुणे : खरा पंचनामा
गणेशोत्सवाच्या धामधुमीत पुण्यात आयुष कोमकर या अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही हत्या आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमधील जुन्या वैमनस्यातून झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर मात्र पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठी कबुली दिली आहे.
पुण्यातील एका न्यूज चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीत पोलीस आयुक्तांनी आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध, गुन्हेगारीतील तरुणांचा वाढता सहभाग अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
आयुष कोमकर हत्या प्रकरणावर बोलताना आयुक्तांनी सांगितले की, 'वनराज आंदेकरच्या हत्येनंतर आंदेकर टोळीकडून सतत 'व्हिक्टिम कार्ड' खेळले जात होते. ते सतत सांगत होते की, वनराजला विनाकारण मारण्यात आले. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना सावध राहावे लागत होते. पीडित आणि साक्षीदारांची बाजू ऐकणे ही पोलिसांची जबाबदारी असते. पण या टोळीतील लोकांवर पोलिसांची बारीक नजर होती.
वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळी प्रत्युत्तरादाखल काहीतरी करू शकते, याची माहिती आम्हाला होती. त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या होत्या. मात्र, टोळीयुद्धाच्या वादात ते सख्ख्या नातवाचीच हत्या करतील, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. असे सांगितले आहे. तसेच या हत्येबाबत आपल्या गुप्तचर यंत्रणेकडे कोणतीही माहिती नसल्याची कबुलीही आयुक्तांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.