Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्मवीर पतसंस्थेतर्फे भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजनसरोजमाई एन. डी. पाटील यांची अध्यक्षीय उपस्थिती : चेअरमन भारती चोपडे यांची माहिती

कर्मवीर पतसंस्थेतर्फे भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन
सरोजमाई एन. डी. पाटील यांची अध्यक्षीय उपस्थिती : चेअरमन भारती चोपडे यांची माहिती

सांगली : खरा पंचनामा

कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांची १३८ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिली.

कर्मवीर आण्णांची जयंती संस्थेच्या वतीने व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी निरनिराळया सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. यावर्षीही संस्थेने सोमवार दिनांक २२ सप्टेबर रोजी आण्णांची जयंती विविध उपक्रमानी साजरी करण्याचे निश्चित केले आहे. या जयंती निमित्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सरोजमाई एन. डी. पाटील या भूषविणार आहेत. तर रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड़
एस. पी. मगदूम यांनी दिली.

हा सोहळा सोमवार दिनांक २२ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल, धामणी, फळ मार्केट रोड, ए. बी. पाटील इंग्लिश स्कुल जवळ इनाम धामणी येथे संपन्न होणार आहे. या जयंती निमित्त संस्थेच्यावतीने विविध सामाजिक संस्था व व्यक्तीना मदतीचा धनादेश कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्मवीर ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी दिली.

संस्थेने आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सतत भरीव योगदान दिले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणीजनांचा सत्कार, रक्तदान शिबीर असे कार्यक्रम संस्थेने राबविले आहेत. तसेच विद्यार्थी, खेळाडू, अनाथाश्रम, वृध्दाश्रम यांना मदत. अपंग पुनर्वसन व वृक्षारोपन, व्याख्यांनाचे आयोजन यासाठी संस्थेने नेहमी मोलाची मदत केली आहे. नैसर्गिक आपत्ती वेळी कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट ने सढळ हाताने मदत केली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा असून विश्वासार्ह व नावाजलेल्या संस्थेमध्ये या संस्थेची गणना होते. संस्थेच्या एकूण ठेवी १२०५ कोटी आहेत. संस्थेने रु. ९८१ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे वसुल भांडवल ५० कोटी २० लाख असून संस्थेचा स्वनिधी रु. १४५ कोटी ८० लाख इतका आहे. सभासद संख्या ६९००० आहे. संस्था भक्कम आर्थिक पायावर उभी असून संस्थेने ३११ कोटी ७० लाख इतकी सुरक्षित गुंतवणुक केली आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे. सभासदांच्या हितासाठी संस्थेने ठेवी कर्जाच्या विविध योजना संस्थेने राबविल्या आहेत. संस्था सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ६४ शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे. सर्व शाखा ऑनलाईन कोअर बँकींगने जोडलेल्या आहेत. संस्थेत SMS बँकींग, RTGS/NEFT / IMPS व लॉकर सुविधा इ. सुविधा देण्यात येत आहेत. आर्थिक क्षेत्रात एक विश्वासार्ह व नावाजलेली संस्था म्हणून कर्मवीर संस्था अग्रक्रमाने काम करीत आहे.

यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्यवाह डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील व संस्थेचे संचालक रावसाहेब जिनगोंडा पाटील, डॉ. अशोक आण्णा सकळे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, ए. के. चौगुले (नाना), डॉ. एस.बी.पाटील (मोटके), सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, लालासाहेब भाऊसाहेब थोटे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.