Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धर्मगुरुच नाव रोडवर लिहिल्याने अहिल्यानगरच्या कोटलामध्ये तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज

धर्मगुरुच नाव रोडवर लिहिल्याने अहिल्यानगरच्या कोटलामध्ये तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज

अहिल्यानगर : खरा पंचनामा

अहिल्यानगरच्या कोटला गावात तणाव निर्माण झाला आहे. अहिल्यानगर-संभाजी नगर रोडवरील कोटला गावात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अज्ञाताने मुस्लिम धर्मगुरुच नाव रोडवर लिहून विटंबना केली. त्यातून हा सर्व वाद निर्माण झाला. मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे ते रस्त्यावर उतरले. यावेळी रास्ता रोकोचा प्रयत्न झाला. अहिल्यानगरच्या कोटलामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अहिल्यानगरच्या कोटला गावात तणाव प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने एकाला ताब्यात घेतलं आहे. रास्ता रोको सुरु झालेला. महामार्ग बंद केलेला. वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या. तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे मोर्चाला सुरुवात झालेली.

पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत होतं. कायदा-सुव्यवस्था बिघडेल असं वागू नका, शांततेत निघून जा. तुम्ही आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, तर पोलीस योग्य पावल उचलतील अशी माईकवरुन घोषणा केली जात होती.

“अहिल्यानगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रतिष्ठान अनुष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडच आयोजन केलं जातं. वेगवेगळ्या भागात ही दौड होते. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. सकाळच्यावेळी घटना घडली, एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. विनाकारण रास्ता रोको करण्याला अर्थ नाही. आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसताना, मागणी केली असती तर समजू शकतो. पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे" असं आमदार संग्राम जगताप म्हणाले. "पोलीस दाखल झालेले आहेत. कायदा कोणी हातात घेऊ नये. लोकशाही मार्गाने संविधानानुसार जे काही आहे ते होईल" असं संग्राम जगताप म्हणाले. "रास्ता रोको चालू होता. जे समाजकंटक आहेत, त्यांनी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. कोणी अफवांवर विश्वास ठेऊ नये" असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.