मुंबई-पुणे द्रुतगती महागाई, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर ई-वाहनांना टोलमाफी
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई-पुणे द्रुतगती महागाई, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरील काही वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरातील वाहचालकांना विशेष फायदा होणार आहे. ई-वाहनधारकांना हा फायदा होणार आहे.
राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर केले. यामुळे ई-वाहनांना चालना मिळाली. याआधीदेखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने योजना सुरु केली होती. राज्य सरकारच्या या इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीच्य निर्णयाचा पुण्याला खूप फायदा झाला आहे. पुण्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
पुण्यात ई-वाहनांची संख्या ही १ लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ई वाहनांवरील सवलत कमी केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यात ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये घट झाली. त्यामुळेच राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील), इलेक्ट्रिक बसेस - राज्य परिवहन उपक्रम (STU) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील वाहनांना टोल माफी आहे. ही सूट २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे.
राज्य सरकारने आदेश काढला आहे. या आदेशानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतू महामार्ग या मार्गांवर टोल भरण्याची गरज नाही. ई वाहन वापरामुळे इंधन खर्च वाचणार आहे. यामुळे प्रदुषणदेखील होणार नाही. त्यात हा टोलमाफीचा निर्णय घेतल्यामुळे ई-वाहन असणाऱ्यांना अधिकच फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंबलबजावणीसाठी महामार्ग प्राधिकरणांना सूचना देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.