म्हैस रेल्वेखाली सापडल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस बराच वेळ थांबून
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर स्थानकातून निघालेली महाराष्ट्र एक्सप्रेस बराच वेळ गांधीनगरजवळ थांबून आहे. म्हैस रेल्वेला धडकून चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पण म्हैस चाकात अडकल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस अर्ध्या तासापासून थांबून आहे.
मंगळवारी दुपारी ठरलेल्या वेळी महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर स्थानकातून निघाली. काही अंतर गेल्यावर गांधीनगरच्या अलीकडे रेल्वेला म्हैस धडकली. यात ती चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला. पण तिचा मृतदेह चाकाखाली अडकल्याने रेल्वे जागीच थांबली. नागरिकांच्या मदतीने म्हैस चाकखालून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस गेल्या अर्ध्या तासापासून थांबून आहे. प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.