Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

म्हणून उद्धव ठाकरेंच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या भावाने मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकला

म्हणून उद्धव ठाकरेंच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या भावाने मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकला

मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकून विटंबना करण्यात आली होती. अखेर 12 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे आरोपीनं या कृत्याची कबुली देत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरच खळबळजनक आरोप केले आहेत. आरोपीनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर कोणते आरोप केले, ते समजून घेऊ या...

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची बुधवारी (17 सप्टेंबर) विटंबना झाल्याने समजताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुतळ्याची स्वच्छता केली. तर अवघ्या 12 तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे. आरोपी हा उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समजते आरोपीनं पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यामुळे या वादाला आता नवं तोंड फुटण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र पावसकर यानं केला असल्याची माहिती समोर आली आहे. आणि याच रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.

दादर पोलिस आरोपी उपेंद्र पावसकरचा जबाब नोंदवून घेतला आहे. आपच्या संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत होते. या प्रकरणी आपण श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी दादर पोलिस स्टेशनमध्ये वारंवार गेलो, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं आरोपीनं पोलिसांनी सांगितलं. आता पोलिस पुढील तपास करत आहेत. आता या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या स्पष्टीकरण देतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.