Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"हैदराबाद गॅझेट रद्द करा" मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान ओबीसी आंदोलकांचा गोंधळ

"हैदराबाद गॅझेट रद्द करा" 
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान ओबीसी आंदोलकांचा गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना ओबीसी आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी आंदोलकांनी हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात आपला निषेध नोंदवला. सरकार ओबीसी समाजावर अन्याय करीत असल्याचेही या आंदोलकांनी घोषणा देताना म्हटले. या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद समोर आला आहे आणि मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाज सरकारवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील नागरिकांना संबोधित करत असताना ओबीसी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवीत घोषणाबाजी सुरू केली. ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, असे म्हणत दोन जण उभे राहिले. सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेला हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा. पाठीमागून आणखीही घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकांना पकडले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय रद्द करावा, अशी आंदोलकांची मागणी होती. यावेळी ओबीसी नेते रामभाऊ पेरकर यांच्यासह तीन ते चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.