Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घाटनांद्रे येथील तरुणाच्या खुनप्रकरणी दोघांना अटकबहिणीसोबत दुसरे लग्न केल्याने धमकावत असल्याने मित्रानेच केली गेम

घाटनांद्रे येथील तरुणाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक
बहिणीसोबत दुसरे लग्न केल्याने धमकावत असल्याने मित्रानेच केली गेम

सांगली : खरा पंचनामा

तालुक्यातील घाटनाद्रे येथील ट्रॅक्टरचालक सुनील शिंदे याच्या खुनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य संशयित पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. एलसीबी आणि कवठेमहांकाळ पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 

अभिजीत सर्जेराव जांभळे (वय १९ रा. गुंडेवाडी,ता.मिरज), विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते (वय ३५ रा. मंगसुळी, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रभु तळगडी असे पसार झालेल्याचे नाव आहे. तिसंगी गावच्या हद्दीत अज्ञातानी सुनील शिंदे याचा दगड डोक्यात घालून खुन केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळी एलसीबी आणि कवठेमहांकाळ पोलीस यांनी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.

एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील संदीप नलावडे, सागर लवटे, सोमनाथ गुंडे व अमर नरळे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय बातमी मिळाली की, घाटनांद्रे येथील खुनाच्या गुन्हयातील संशयित मालगाव ते मिरज रोड येथे आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक पवार यांच्या पथकाने मालगाव गावचे हद्दीत रोडवर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर विनायक मोहिते व मयत सुनिल शिंदे हे एकमेकाचे मित्र आहेत. विनायक मोहिते याचे पहिले लग्न झाले असताना त्याने मृत सुनील शिंदे याच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केल्याने मृत सुनील हा विनायक मोहिते यास वारंवार धमकी देत होता. त्यामुळे अभिजीत जांभळे, विनायक मोहिते आणि त्यांचा मित्र प्रभु तळगडी यांनी सुनील शिंदे याचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची कबुली दिली. 

एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक, पंकज पवार, उपनिरीक्षक, विनायक मसाळे, सागर लवटे, संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर टिंगरे, संदिप गुरव, सतिश माने, मछिंद्र बर्डे, शिवाजी शिद, उदय माळी, पोशि केरबा चव्हाण, विक्रम खोत, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील नागेश मासाळ व सिध्देश्वर कुंभार, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.