लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान लज्जास्पद कृत्य, स्वयंसेवकाने महिलेला लाथ मारली
मुंबई : खरा पंचनामा
नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेला मुंबईतील प्रतिष्ठित 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून अगदी अनंत चतुर्थीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी जमते. अशावेळी गणरायाचे चरण दर्शन घेण्यासाठी भलीमोठी रांग असून दर्शन घेत असताना धक्काबुक्की झाल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशातच लालबागमधील एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी उत्सवादरम्यान एक स्वयंसेवक स्टेजवर उभा राहून गणेश दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या एका महिला भक्ताला लाथ मारत असल्याचे दिसत आहे. ६ सप्टेंबर रोजी, मुंबई आणि महाराष्ट्रात गणेश विसर्जन विधी सुरू असताना, गणपती भक्तांचे पारंपारिक केंद्र असलेल्या लालबागमध्ये मोठी गर्दी जमली होती. इतक्या मोठ्या संख्येने गर्दीचे व्यवस्थापन करणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. परंतु यावेळी, एका स्वयंसेवकाने केलेल्या गैरवर्तनामुळे भाविक संतापले आहेत.
इंस्टाग्रामवर एका युझरने लालबागचा राजा दर्शनावेळी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये एक पुरुष स्वयंसेवक भाविकांवर ओरडून रांगेत उभ्या असलेल्या भावा-बहिणीला लाथ मार्ट असल्याचे दिसत आहे. दर्शनाच्या गर्दीतील हे त्रासदायक दृश्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरले असून यावर नेटकरींसह भक्तांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
या व्हिडिओमुळे ऑनलाइन जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, "हे मूर्खपणाचे आहे. लोकांनी लालबागला जाणे थांबवावे आणि घरी गणपतीची पूजा करावी. वर्षभर देव तुमचे रक्षण करतो, या तथाकथित स्वयंसेवकांचे नाही." दुसऱ्याने लिहिले की, "काय अहंकार ! अशा स्वयंसेवकांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे." तिसऱ्या युझरने म्हटले की, "या उद्धटपणा पुरे झाला, लोकांनाही जागे होण्याची गरज आहे."
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा गर्दी व्यवस्थापन आणि लोकप्रिय गणेश मंडळांमधील भक्तांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओवर अधिकाऱ्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.