पोलिसाची निघृण हत्या, बायको अन् मुलाकडून जीव जाईपर्यंत मारहाण
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादात बायको आणि मुलाने या पोलिसाला बेदम मारहाण केली. या मारहणीत पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांच्या बायको आणि मुलाला बुधवारी अटक करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती पण शवविच्छेदन अहवालात अनैसर्गिक मृत्यूची चिन्हे आढळून आली. तसंच पोलिसाच्या नातेवाईकांनी त्याची बायको आणि मुलाने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले प्रवीण सूर्यवंशी (५२ वर्षे) हे सायनमधील प्रतीक्षा नगर येथील पोलिस क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान, प्रवीण यांचा भाऊ आणि इतर नातेवाईकांनी आरोप केला की त्याचा मृत्यू अपघाती नाही. त्यानी प्रवीण यांची बायको स्मिता सूर्यवंशी (४२ वर्षे) आणि मुलगा प्रतीक (२२ वर्षे) यांच्याबाबत संशय व्यक्त केला. कारण प्रवीण यांचे बायको आणि मुलासोबत दीर्घकाळापासून आर्थिक वाद सुरू होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.