Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बॉलीवूडमधील अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक; ३५ कोटींचे कोकेन जप्त

बॉलीवूडमधील अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक; ३५ कोटींचे कोकेन जप्त

चेन्नई : खरा पंचनामा

बॉलीवूडमधील सहाय्यक भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्याला अंमली पदार्थांची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. कस्टम्स आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) संयुक्त कारवाईत त्याच्याकडून तब्बल साडेतीन किलो कोकेन जप्त करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ३५ कोटी रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अभिनेता रविवारी पहाटे सिंगापूरहून चेन्नई विमानतळावर पोहोचला होता. गुप्त माहितीच्या आधारे एअर इंटेलिजन्स युनिटने त्याची तपासणी केली. त्याच्या चेक-इन सामानात लपवून ठेवलेले पांढऱ्या पावडरसारख्या पदार्थाचे पाउच आढळले. फील्ड ड्रग टेस्टमध्ये ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

तपासात समोर आले की तो कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईला आला होता. चौकशीत त्याने कबुली दिली की कंबोडियामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी त्याला ही ट्रॉली दिली होती आणि ती चेन्नई विमानतळावर एका रिसीव्हरकडे द्यायची होती. मात्र, तपास अधिकाऱ्यांच्या मते ही खेप मुंबई किंवा दिल्लीला नेण्याचा उद्देश असावा.

अभिनेत्याने 'स्टुडंट ऑफ द इयर' सारख्या चित्रपटांमध्ये लहान भूमिका केल्याचे समोर आले आहे. सध्या डीआरआय त्याच्याशी संबंधित ड्रग्ज नेटवर्कचा तपास करत आहे, तर कस्टम्स त्याच्या प्रवासाचा तपशील आणि यापूर्वी तस्करी केली आहे का याचा शोध घेत आहे.

गेल्या दोन आठवड्यांत चेन्नई विमानतळावर ड्रग्ज जप्त करण्याची ही तिसरी मोठी घटना आहे. १६ सप्टेंबर रोजी इथिओपियाहून आलेल्या एका केनियन प्रवाशाकडून २ किलो कोकेन जप्त झाले होते. तर, १ सप्टेंबरला कस्टम्सने फेरेरो रोचर चॉकलेट कॅनमध्ये लपवलेले तब्बल ५.६ किलो कोकेन सापडवून दोन प्रवाशांना अटक केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.