Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तक्रारदारालाच साफसफाई आणि कपडे धुण्याची अनोखी शिक्षा

तक्रारदारालाच साफसफाई आणि कपडे धुण्याची अनोखी शिक्षा

मुंबई : खरा पंचनामा

'तुम से तुम तक' या नवीन मालिकेसाठी एका मनोरंजन वाहिनीविरूद्ध बनावट तक्रार दाखल केल्याचे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने तक्रारकर्त्यांनाच जे जे रुग्णालयात साफसफाई आणि कपडे धुण्याचे काम करण्याचे आदेश दिले.

'तुम से तुम तक' या न मालिकेप्रकरणी वाहिनीविरूद्ध दाखल केलेली बनावट तक्रार रद्द करण्यासाठी झी टीव्हीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, तक्रारदाराच्या वर्तनावर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. सुरूवातीला तक्रारकर्त्याने सायबर पोलिसांना त्याचे नाव सुनील शर्मा सांगितले होते. तथापि, गेल्या महिन्यात न्यायालयासमोर उपस्थित झाल्यानंतर त्याने त्याचे नाव सुनील महेंद्र शर्मा असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या आधार कार्ड, पॅनकार्डसह अन्य कागदपत्रांवर त्याचे नाव महेंद्र संजय शर्मा असे नमूद करण्यात आल्याची न्यायालयाने त्याला समुदाय सेवेचे आदेश देताना प्रामुख्याने दखल घेतली.

ही तक्रार केवळ समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या बातम्या आणि त्यावरील मतांवर आधारित होती. खोट्या, एकतर्फी बातम्यांवर अशी चुकीची तक्रार दाखल करण्याबाबत तक्रारदाराने दिलेल्या स्पष्टीकरणावर खंडपीठाने आपली नाराजी नोंदवली. तसेच, हे कृत्य कदाचित एखाद्या प्रतिस्पर्ध्याच्या इशाऱ्यावर केल्याचे दिसून येते. या पैलूची पोलिसांनी चौकशी करावी, असे स्पष्ट करताना खंडपीठाने शर्मा यालाजे. जे. रुग्णालयात १५ दिवसांसाठी सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.