'IPS अंजना कृष्णा यांना दिली खोटी माहिती'; महसूल अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
पंढरपूर : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आलेल्या कुई येथील वाळू प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. गावातील माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, महसूल विभागाचे मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना खोटी माहिती दिली होती. त्यांनी गावातील तळ्यात तब्बल 200 ट्रक वाळू साठवलेली आहे, असे सांगितल्यामुळे अंजना कृष्णा गावात दाखल झाल्या.
खरे तर त्या दिवशी गावात रस्त्यासाठी मुरूम उपसा सुरू होता. मात्र, चुकीच्या माहितीनुसार अंजना कृष्णा थेट तळ्याकाठावर गेल्या. तिथे कोणतीही वाळू नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी मुरूम उपसा सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यांनुसार, मंडलाधिकारी सुजित शेळवणे यांच्या नावावर असलेल्या काही गाड्या बेकायदा वाळू उपशात सहभागी आहेत. गावात आलेल्या टिपर व संबंधित गाड्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळेच त्यांनी अंजना कृष्णा यांना चुकीची माहिती दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणामुळे ग्रामस्थ संतप्त असून सुरुवातीपासूनच शेळवणे यांची चौकशी व्हायला हवी होती, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. एकीकडे गावातील ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झालेला असताना, दुसरीकडे मंडल अधिकाऱ्यावरील गंभीर आरोपांवर चौकशी का झाली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण चौकशी झाल्यास या प्रकरणामागील सत्य बाहेर येईल, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.