उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या NIRF जागतिक क्रमवारीत गुणवत्ता व स्थान वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालय मुंबई येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या NIRF जागतिक क्रमवारीत गुणवत्ता व स्थान वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा पार पडली.
उच्च शिक्षण क्षेत्राला अधिक सक्षम व स्पर्धात्मक बनवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि विकास योजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच राज्यातील शासकीय व शासकीय स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी पंचवार्षिक विकास आराखडा सादर करण्यात यावेळी आला.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, तसेच सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.