Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी आहे. शासनाने पोलिस उपनिरीक्षक  पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आलेली ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मेहनती आणि अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या परीक्षेमुळे कमी वयातच PSI पदावर पदोन्नती मिळून पोलिस दलात तरुण आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलिस कर्मचाऱ्यांचे करिअर नव्या उमेदीने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना PSI पदासाठी 25 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.