मिरजेतील घटनेबाबत अफवा पसरवल्यास कडक कारवाई करणार
दोघांना अटक, 20 जणांची ओळख पटली; परिस्थिती नियंत्रणात : विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी
सांगली : खरा पंचनामा
मिरजेत दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्य कारण नाही. मिरजेतील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. त्या घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर 15 ते 20 जणांची ओळख पटवण्यात यश आले आहे. या घटनेबाबत अफवा पसरवणाऱ्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर 24 तास लक्ष असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिला.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, खबरदारीचा उपाय म्हणून एसआरपीएफची एक तुकडी तसेच बाहेरील जिल्ह्यातील बंदोबस्त मिरजेत तैनात करण्यात आला आहे. सध्या मिरजेतील परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेचे कोठेही पडसाद उमटले नाहीत. घटनेच्या अनुषंगाने मोर्चा, निदर्शने अथवा अन्य आंदोलन करणाऱ्यांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिरजेत लक्ष ठेवण्याची जबाबदारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याकडे दिली आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अधिकारी मिरजेत तैनात करण्यात आले आहेत.
किरकोळ वादाच्या घटनेबाबत सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना काही माहिती द्यायची असल्यास स्थानिक पोलीस किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहनही महानिरीक्षक फुलारी यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.