Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रम्प अन् 20 रुपयांमुळे अडकले रोहित पवार... थेट पोलिसात गुन्हा दाखल

ट्रम्प अन् 20 रुपयांमुळे अडकले रोहित पवार... थेट पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई : खरा पंचनामा 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्यामुळे रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत हा गुन्हा दाखल झाला आहे.

रोहित पवार हे अनेकदा त्यांची भूमिका अगदी रोखठोकपणे मांडतात. मात्र अशीच भूमिका मांडताना त्यांनी तयार केलेल्या एका बोगस आधारकार्डमुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस आधारकार्डप्रकरणी रोहित पवारांविरोधात दक्षिण मुंबईत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी धनंजय वागस्कर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत बोगस आधारकार्ड कसं बनवता येतं याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो वापरुन अवघ्या 20 रुपयांमध्ये आधारकार्ड बनवून दाखवलं. अशीच आधारकार्ड दुबार मतदार आयडी बनवण्यासाठी वापरल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता.

रोहित पवार यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनवण्याचे प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस आधारकार्ड बनवणे हा गुन्हा असून हे देशविरोधी कृत्य आहे. याबाबत भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक धनंजय वागस्कर यांनी रोहित यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या आधारे मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी दिली. संबंधित संरचनेमध्ये भारतात बोगस आधार कार्ड बनवता येत नाही. रोहित पवार यांना आता याबाबत पळ काढता येणार नसून रोहित यांचा 'बोलविता धनी' कोण यांचा सखोल तपास होणार असल्याचेही बन यांनी नमूद केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.