बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प, सामान्य नागरिकांची कोंडी
नागपूर : खरा पंचनामा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे.
दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर -हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी गेल्या 15 तासांहून अधिककाळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहे. अशातच एका कष्टकऱ्यासाठी दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत का आणता? असा थेट सवाल करत अडचणीत अडकलेल्या महिलांनी बच्चू कडू यांना थेट प्रश्न केला आहे.
नागपुरात बच्चू कडू यांच्या सोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलनामुळे आउटर रिंग रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल 14 ते 15 तास अडकलेले अनेक कुटुंब आणि सामान्य नागरिक आता पायीच महामार्गावर पुढच्या दिशेने निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक महिलांनी संपूर्ण रात्र महामार्गावर एसटी बस किंवा खाजगी वाहनांमध्येच काढली आहे. सकाळी मात्र हातात सोबतचे जड साहित्य आणि लेकरांना घेऊन महिलांचे ग्रुप्स आऊटर रिंग रोडवर आपल्या पुढच्या डेस्टिनेशनच्या दिशेने पायी निघालेले पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अनेक महिलांनी बच्चू कडू यांच्या संदर्भात तीव्र रोष व्यक्त करत एका कष्टकऱ्यासाठी बच्चू कडू तुम्ही आंदोलन करत आहात, मात्र दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत आणत आहात, असे प्रश्न महिलांनी उपस्थित केले आहे.
बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांमुळे फक्त नागपूर - वर्धा महामार्गावरच कोंडी झालेली नाही. तर एका बाजूला नागपूर -अमरावती आणि दुसऱ्या बाजूला नागपूर - रायपूरला दरम्यानचे जे दोन समांतर महामार्ग आहे, त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर ही आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे आऊटर रिंग रोडवर ही कित्येक किलोमीटर पर्यंत ट्रक आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.