कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद
कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टर माईंड : 5 जणांना अटक, इनोव्हा कारसह 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त : पोलीस अधीक्षक संदीप घुगे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
पहा व्हिडीओ
मिरज : खरा पंचनामा
चलनातील पाचशे, दोनशे रुपयांच्या हुबेहूब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी मिरजेत आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशीनंतर कोल्हापूर पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या मास्टर माईंडसह कोल्हापूर जिल्ह्यातील चौघासह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा कारसह 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या.
मास्टर माईंड पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावड, जि. कोल्हापूर), सुप्रीत काहाण्या देसाई (वय २२, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर), सिध्देश जगदीश म्हात्रे (वय २८, रा. रिध्द गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस वेवर निलजी बामणी येथे एकजण बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकसह छापा टाकून सुप्रीत देसाई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 42 हजार रुपये किमतीच्या पाचशेच्या 84 बनावट नोटा सापडल्या. त्याला कार आणि नोटासह ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर पोलीस हवालदार इब्रार इनामदार याच्या कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी येथील ऑफिस मधून नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर तसेच अन्य साहित्य जप्त केले. या नोटा वितरित करण्यात सहभाग असणारे राहुल जाधव, नरेंद्र शिंदे तसेच मुंबई येथील सिद्धेश म्हात्रे याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून इनोव्हा कार, पाचशे रुपयांच्या 19 हजार 687 बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या 429 नोटा, स्कॅनर, प्रिंटर असा 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना दि. 13 ऑकटोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, राहुल क्षीरसागर, नानासाहेच चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, चिनोद चव्हाण, विनायक झांबरे, संतोष डामसे, महेश गुरव, संदिप घोडे, विकास कांचळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, निवास माने, सुधीर खोंद्रे, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.