Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार"

"तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार"

जोधपूर : खरा पंचनामा

लेह हिंसाचारात झालेल्या चार जणांच्या मृत्यूची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी लडाखी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केली आहे.

त्यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून एक पत्र लिहिलं आहे, जे आज (5 ऑक्टोबर) जारी करण्यात आले. वांगचुक यांनी लिहिले की, "ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी आणि अटक झालेल्यांसाठी मी प्रार्थना करतो. चार जणांच्या मृत्यूची स्वतंत्र न्यायिक आयोगामार्फत चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहीन." हे पत्र लेह एपेक्स बॉडी (LAB) चे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट मुस्तफा हाजी यांनी शेअर केले होते.

अॅडव्होकेट मुस्तफा हाजी आणि वांगचुक यांचे बंधू त्सेतान दोर्जे ले यांनी काल 4 ऑक्टोबर रोजी तुरुंगात वांगचुक यांची भेट घेतली. 24 सप्टेंबर रोजी लेह हिंसाचार भडकवल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. वांगचुक यांच्या सुटकेसाठी असलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.