Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार तानाजी सावंतांच्या नावाचा उल्लेख; घायवळची व्यावसायिकाला धमकी

आमदार तानाजी सावंतांच्या नावाचा उल्लेख; घायवळची व्यावसायिकाला धमकी

पुणे : खरा पंचनामा

पुणे पोलिसांच्या रडारवर असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळचे दिवसें दिवस एक-एक कारनामे समोर येत आहेत. अशातच, घायवळ एका व्यावसायिकाला धमकी देतानाचा व्हॉट्सअप कॉल व्हायरल झाला आहे. विशेष बाब म्हणजे या कॉलमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या नावाचा उल्लेख आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एकिकडे घायवळ परदेशात पळून गेला आहे. लुक आऊट नोटीस जारी केली आहे. त्याला पासपोर्ट कसा मिळाला याची चौकशी पोलिस करत आहेत. त्यांच्यावर राजकीय वरहस्त कोणाचा असा प्रश्नदेखील शहरवासीयांमध्ये उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे घायवळचा हा धमकीचा कॉल समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

धाराशिवमधील एका व्यावसायिकाला कॉल करुन धमकीचा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलेश घायवळ थेट या व्यावसायिकाला तुझे दुकानं बंद पाडतो सावंत साहेबांचं नाव कशाला घेतो अशी धमकी देताना हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे.

"तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर तू घरी ये..." अशी शिवीगाळ करत धाराशिवमधील धंदे बंद करण्याची धमकी दिली आहे. या व्हिडिओमुळे राजकीय गोटात नेत्यांच्या गुंडांशी असलेल्या साटेलोट्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.