Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साताऱ्याच्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं कारण आलं समोर

साताऱ्याच्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं कारण आलं समोर

फलटण : खरा पंचनामा

साताऱ्यातील फलटणमध्ये डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दोन आरोपींचे नावे समोर आली आहेत. यातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने डॉक्टर महिलेवर ४ वेळा बलात्कार केला. या दोघांच्या जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेने आयुष्य संपवलं. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम अॅडव्हान्स रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे.

डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाल्याचे पोस्टमार्टम अॅडव्हान्स रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. पोस्टमॉर्टमचा अॅडव्हान्स रिपोर्ट सातारा पोलिसांना प्राप्त झाला. मृत्यूपूर्वी पीडित डॉक्टर महिलेवर कोणत्याही प्रकारचे व्रण किंवा खुणा नसल्याचे स्पष्ट झालं आहे. पीडित महिलेचे कुटुंबीय मृतदेह घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत.

साताऱ्यातील फलटणमध्ये डॉक्टर महिलेला दोघांनी त्रास दिला. आरोपी गेल्या काही महिन्यांपासून आरोपी डॉक्टर महिलेला त्रास देत होते. या प्रकरणी डॉक्टर महिलेने मृत्यूआधी पोलीस उपाधीक्षकांना पत्र लिहिले होते. 'पेशंट फिट आहे असा अहवाल द्या", यासाठी पोलिसांकडून डॉक्टर महिलेवर दबाव होता. एखाद्या आरोपीला रुग्णालयात आणल्यानंतर पोलिसांकडून अहवाल प्राप्त व्हावा, यासाठी दबाव होता. त्यानंतर डॉक्टर महिलेने पहिल्यांदा सर्व प्रकरणाची तक्रार पोलिस निरीक्षक महाडिक यांना केली होती.

पोलिस निरीक्षक महाडिक यांनी डॉक्टर महिलेला उडावाउडवीचे उत्तरे दिली. महिलेने या पत्रात तीन पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे लिहिली होती. यादरम्यान आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेने ४ वेळा अत्याचार केल्याचा आरोप डॉक्टर महिलेने शेवटच्या संदेशात केला.

या डॉक्टर महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जून महिन्यात पत्र लिहिलं होतं. डॉक्टर महिलेच्या पत्राची आधीच दखल घेण्यात आली असती. तर डॉक्टर महिलेचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशीही मागणी मृत डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.