Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजुरा बोगस मतदार नोंदणीत भाजप 'कनेक्शन'एफआयआरमध्ये नोंद केलेले मोबाईल भाजपशी संबंधितांचे

राजुरा बोगस मतदार नोंदणीत भाजप 'कनेक्शन'
एफआयआरमध्ये नोंद केलेले मोबाईल भाजपशी संबंधितांचे

चंद्रपूर : खरा पंचनामा

राजुरा मतदार संघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरणात शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या बोगस मतनोंदणी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. तसेच या बोगस मतदार नोंदणी प्रकरणात पोलीस एफआयआरमधील दोन मोबाईल क्रमांक भाजप पदाधिकाऱ्यांशी थेट संबंधित आहे. भाजपाचे थेट कनेक्शेन दिसत असतांना पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलविले नाही, त्यांचा जबाब नोंदविला नाही किंवा अटक केली असा थेट आरोप केला आहे.

विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी मतचोरी व बोगस मतदार नोंदणी प्रकरणात राजुरा मतदार संघाचा उल्लेख केल्यापासून राजुरा विधानसभा सातत्याने चर्चेत आहे. आता तर शेतकरी संघटनेचे पराभुत उमेदवार माजी आमदार अॅड. वामनराव चटप, अॅड. दिपक चटप यांनी बोगस मत नोंदणी प्रकरणात भाजपाचे थेट कनेक्शन दिसून येत आहे असा आरोप केला आहे. राजुरा विधानसभा मतदार संघातील यादीतील ६ हजार ८५३ बोगस मतदार नोंदणी प्रकरणात १९ ऑक्टोंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

ठोस पुरावे असूनही पोलिस प्रशासन निष्क्रिय आहे. या एफआयआर मध्ये स्पष्ट नावे व मोबाईल क्रमांक नमूद आहेत, तरीही १२ महिने उलटून गेले तरी जबाब नोंद, अटक किंवा कसलीही चौकशी झालेली नाही. विशेष म्हणजे, १५ व्या क्रमांकावरचा मोबाईल नंबर ७८२०८६४५१९ हा अनिल झाडे यांचा आहे, जे भाजप गडचांदूर नेते निलेश ताजणे यांच्या मेडिकलशी संबंधित आहेत. तसेच १६ व्या क्रमांकावरचा मोबाईल नंबर ९६०७२१७१४३ हा प्रतीक सदानपवार यांचा आहे, जे गडचांदूरचे भाजप कार्यकर्ते आहेत व ज्यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व विद्यमान आमदार देवराव भोंगले यांच्या सोबतचे छायाचित्र उपलब्ध आहेत. हे दोन्ही नंबर एफआयआर मध्ये स्पष्ट नमूद असूनही, अजूनपर्यंत त्यांना अटक करून चौकशी का झालेली नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तसेच गंगाधर, बंडू व क्रीश लिहिलेले नाव व नंबर हे बाखर्डी परिसरातील असून ते देखील बीजेपी संबंधित आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.