Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती

पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील शिवाजीनगर येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्रीविरोधात उभ्या राहिलेल्या लढ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई येथे धर्मादाय आयुक्तालयात आज (सोमवार दि. 20) या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर 'स्टेटस्को' म्हणजेच परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जैन समाजाच्या संघर्षाला न्यायालयीन पाठबळ मिळालं असून जागेच्या विक्रीला तातडीचा ब्रेक लागला आहे.

एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी अत्यंत भक्कम, कायदेशीर आणि पुराव्यांसहित मांडणी केली. जैन समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन आणि इतर अनेक बांधव देखील सुनावणीसाठी मुंबईत उपस्थित होते. संपूर्ण समाजाचे लक्ष लागलेल्या या सुनावणीत न्यायालयाने 'स्टेटस्को' आदेश दिला आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.