खेळण्यातील नोटा वापरुन महापालिका उपायुक्तावर एसीबीचा ट्रॅप
ठाणे : खरा पंचनामा
ठाणे महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. २५ लाख रुपयांची लाच घेताना पथकाने पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्याला अटक केली. खेळण्यातील नोटांचा वापर करुन एसीबीच्या पथकाने पाटोळे यांच्यावर कारवाई केली. विशेष म्हणजे, पाटोळे यांनी बांधकाम व्यवसायिकाकडून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील २५ लाख रुपयांचा हप्ता घेताना ही अटक करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. बुधवारी ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा केला जात होता. त्यामुळे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाटोळे हे देखील बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या दालनात असताना अचानक मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांच्या दालनाबाहेर पोहचले. अवघ्या काही मिनीटांत हे वाऱ्यासारखे पसरल्यानंतर पाटोळे यांच्या दालनाबाहेर पत्रकारांचा, महापालिका कर्मचाऱ्यांचा, ठाण्यातील काही नागरिकांचा गराडा पाहायला मिळाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद दाराआड पाटोळे यांची चौकशी केली. पाच तास त्यांची चौकशी केल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.