पुण्यातील १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात १७पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत.
१७ पोलिस निरीक्षकांपैकी पैकी ६ जण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेत. वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची कंट्रोल आणि वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या अनेक युनिटच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस निरीक्षकांचे नाव (सध्याचे ठिकाण) आणि नवीन नेमणुकीचे ठिकाण -
कांचन जाधव (पोलिस निरीक्षक विश्रांतवाडी पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा
रवींद्र शेळके (पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
माया देवरे (पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे): गुन्हे शाखा
सुनील पंधरकर (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
विजय टिकोळे (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा): पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा) 
अजय संकेश्वरी (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
संतोष सोनवणे (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा
संदीपान पवार (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा
अरुण हजारे (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
गुरुदत्त मोरे (पोलिस निरीक्षक, नांदेड सिटी पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, विशेष शाखा
दत्ताराम बागवे (पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा
अंजुम बागवान (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे
मंगेश हांडे: पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे
स्मिता वासनिक (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे
भाऊसाहेब पाटील (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे
कुमार घाडगे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे
प्रदीप कसबे (पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
 
 
 
 
