Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर, DM च्या घोषणा

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर, DM च्या घोषणा

बीड : खरा पंचनामा

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने भक्तिगडावर सुरू झालेल्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सलग दुसऱ्या वर्षी हजेरी लावली. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यानंतर ते भाषणाला उठले आणि डीएमऽ डीएमऽऽ अशी एकच घोषणाबाजी सुरू झाली. मुंडेंना बोलताही येईना, त्यामुळे 'असलं तुम्ही केल्यामुळे, तुम्हाला माहीत नाही काय काय झालं...' असे सूचक विधान त्यांनी केले.

बीड जिल्ह्यात भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर आणि इतर नेतेमंडळी उपस्थित आहेत. मेळाव्याच्या सुरूवातीला माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे भाषण झाले, त्यानंतर माजी मंत्री जानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दसरा मेळाव्याला उपस्थित असलेल्या काही लोकांच्या हातात वाल्मिक कराड याचे बॅनर होते. त्या बॅनरवर 'युई सपोर्ट वाल्मिकअण्णा' असा आशय होता. त्यावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेषतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

दुसरीकडे, जानकर यांच्या भाषणानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे हे बोलायले उठले आणि एकच जल्लोष सुरू झाला. उपस्थितांमधून डीएमऽऽऽ डीएमऽ अशा घोषणा दिल्या जात होत्या. तो आवाज एवढा मोठा होता की, धनंजय मुंडे यांना बोलताही येईना. पण, मुंडे तसेच बोलत राहिले. मात्र, घोषणाबाजी कमी होत नसल्याने अखेर धनंजय मुंडेंनी त्या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावले.

असलं तुम्ही केल्यामुळे तुम्हाला माहिती नाही, काय काय झालं. तुम्हाला माहिती नाही.... एक गोष्ट ऐकता का? मग शांत बसा, शांत बसा अशी विनंती केली. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी होत नव्हता. शेवटी धनंजय मुंडे यांनी त्या गोंधळताच भाषणाला सुरुवात केली. मात्र, या घोषणाबाजीची राज्यात चर्चा सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.