'माझ्याकडे महाराष्ट्राला हादरवून टाकणारा डेटा : 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्या अन्यथा...'
मुंबई : खरा पंचनामा
येत्या 24 तासांत अजित पवारांचा राजीनामा झालाच पाहिजे नाहीतरमी दिल्लीला जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या भेटीची मागणी करतेय असे विधान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केले. अमेडीया कंपनीबाबत माझ्या हातात महाराष्ट्राला हादरवून टाकणारा डेटा असल्याचे त्या म्हणाल्या. अमेडीया कंपनीनं डेटा सेंटर सुरु करण्याकरता अॅप्लीकेशन केलं. यात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा प्रश्नच नसल्याचे दमानिया म्हणाल्या.
अमेडीया कंपनीनं दिलेल्या अफीडेवीटमध्ये डेटा सेंटरसाठी जमीन आणि बिल्डींगचे फिक्स कॅपिटल समोर असे डॅश दाखवण्यात आल्याचा गौप्यस्फोट दमानियांनी केला. इतर मशिनरी कॅपीटल 98 लाख दाखवण्यात आल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.
शितल तेजवानीसोबत झालेल्या टर्म शीटवर 40 एकर जमिन शितल तेजवानीकडून 5 वर्षांच्या लीजवर डेटा सेंटर आणि आयटी संबंधित अमेडीया कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी देण्यात आल्याचे दाखवण्यात आल्याची माहिती दमानियांनी दिली.
पार्थ पवारांना वाचवण्याकरता येवलेला बेल अॅप्लीकेशन मंजूर झालंय. पण येवलेला अटक झाली पाहीजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. पोलिस स्थानकातील स्टेशन डायरीतील नोंद अंजली दमानीयांकडून दाखवण्यात आली. अमेडीयाची काही माणसं बोटॅनिकल गार्डनच्या परिसरात गेले आणि त्यांनी दादागिरी केली. पोलिस स्टेशनमध्येही ही माणसं गेली. ट्रेसपासींगचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप दमानियांनी केला.
पार्थ पवार यांचे टॉवर लोकेशन शोधले जावे, सिडीआर काढला जावा, अशी मागणी त्यांनी केली असून मला चौकशी समितीवरच आक्षेप असून समिती बदलली जावी असे त्या म्हणाल्या. बावनकुळे म्हणतायेत मुठेंची समितीच नाही, मग मुठे समिती नेमलीय कुणी आम्ही तर नेमली नाही ना? असा प्रश्न त्यांनी विचारला. उद्या मी मंत्रालयात जाणार असून याप्रकरणात लेखी मागण्या करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. महाराष्ट्रात सळो की पळो झाले की दिल्लीला पळा, पाया पडा, असे त्यांनी म्हटले आहे.. याद्वारे त्यांनी पुण्यातील भूखंड घोटाळ्यामुळे अडचणीत सापडल्यामुळेच अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याचे सूचित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी राज्यातील काही मुद्यांवर अमित शहांची भेट घेतली असेल, असे म्हणत याविषयावर भाष्य करणे टाळले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.