Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात तुपाचा 250 कोटींचा घोटाळा

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात तुपाचा 250 कोटींचा घोटाळा

तिरुपती : खरा पंचनामा

देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक तिरुमाला तिरुपती देवस्थानातील लाडूच्या प्रसादाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर केला जात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा तिरुपतीच्या लाडवांसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपासंदर्भातील मोठा घोटाळा समोर आला आहे.

सीबीआय तपासानुसार, उत्तराखंडच्या एका डेअरीने पाच वर्षांपर्यंत तिरुपती मंदिराला ६८ लाखांचं बनावटी, भेसळयुक्ती तूप सप्लाय केलं. ज्याची किंमत तब्बल २५० कोटींची असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विशेष तपास टीमने सांगितलं की, भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी २०१९ ते २०२४ पर्यंत तूप सप्लाय करीत होते. धक्कादायक बाब म्हणजे या डेअरीने कधीही दूध किंवा लोणी खरेदी केलं नाही. तर मोनोडाइग्लिसराइड्स आणि असिटिक अॅसिड एस्टरचा वापर करीत कृत्रिमपणे तूप तयार केलं आणि हेच तूप तिरुपती मंदिराला पाठविण्यात आलं. आरोपी अजय कुमार सुंगध याच्या अटकेनंतर तपास अधिकाऱ्याला ही माहिती मिळाली. अजय कुमार यानेच हे केमिकल डेअरीला निर्यात केले होते, अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त शेअर केलं आहे.

सीबीआयच्या रिपोर्टनुसार, उत्तराखंडच्या भगवानपूरमध्ये असलेल्या या डेअरची संचालक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी भेसळयुक्ती देशी तूपासाठी एक युनिट तयार केली होती. त्यांनी दूध खरेदी केल्याचे खोटे रेकॉर्डही तयार केले होते. २०२२ मध्ये जेव्हा भोले बाबा डेअरली ब्लॅकलिस्ट करण्यात आलं, त्यावेळी या लोकांनी इतर कंपनीच्या नावावर (उदा. वैष्णवी डेअरी (तिरुपती), माल गंगा डेअरी (उत्तर प्रदेश), एआर डेअरी फूड्स (तमिळनाडू)) भेसळयुक्त तूप सप्लाय करीत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.