300 कोटी घेऊन शीतल तेजवानी परदेशात फरार?
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर भूखंड घोटाळा प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली आहे. पार्थ पवार आणि भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनी मार्फत हा जमीन व्यवहार करण्यात आला होता. पण यात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकारण तापलं असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पार्थ पवार यांच्याशी या जमिनीचा व्यवहार करणारी शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरेगाव पार्क आणि बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची मास्टरमाईंच असलेली शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच तिचा फोनही बंद असून ती राहत्या पत्त्यावरही आढळून आलेली नाही. शीतल तेजवानी नवऱ्यासोबत परदेशात पळून गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. सुमारे १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. नियमानुसार या खरेदीवर सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागले असताना, फक्त ५०० रुपयांवर व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. विरोधकांनी या प्रकरणावर टीकेची झोड उठवत सरकारवर "प्रशासनाचा गैरवापर करून जमीन व्यवहार कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न" झाल्याचा आरोप केला आहे. अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीमध्ये पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असल्याने ते थेट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.